
Buldhana : वंचित बहुजन आघाडीकडून तहसील कार्यालयसमोर धरणे आंदोलन
लोणार : आर्थिक आरक्षण बाबत चा निर्णय रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणीसाठी तालुका वंचित बहुजन आघाडी कडून तहसील कार्यालयासमोर आज एक दिवसीय धरणे आंदोलन जेष्ठ नेते भाई महेंद्र पनाड तालुका अध्यक्ष दिलीप राठोड यांचे नेतृत्वात करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांना सर्वसाधारण प्रवर्गातील १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. तीन विरुद्ध दोन न्यायमूर्तीच्या निर्णयाद्वारे ही घोषणा झाली. यावर घटना पिठाचे सुद्धा एकमत नाही. ही बाब गंभीर आहे. संसदेची घटना दुरुस्ती परिच्छेद ३६७ च्या विरोधात आहे १०% आर्थिक आरक्षण वगळता उर्वरित एस सी एस टी आरक्षण त ही आर्थिक मागास आरक्षण बाबतचा विषय आगामी काळात येऊ शकतो. हा आदेश सामाजिक विषमते पेक्षा आर्थिक विषमतेला महत्व देतो ही बाब देश हिताच्या दृष्टीने घातक आहे. म्हणून झालेला आदेश रद्द करण्यात यावा.
तहसीलदार सैफ न नदाफ यांना या वेळी निवेदन देण्यात आले. यावेळी मालतीताई कळबे पांडुरंग सुरुसे अक्षय जाधव शिवप्रसाद वाठोरे, सय्यद अब्दुल राजेक, प्रशांत, चव्हाण, बाळाभाऊ चव्हाण, गौतम गवई, राहुल पनाड माजी सरपंच सुलतानपूर, अशोक पनाड, एकनाथ सदावर्ते, बाळू वानखेडे, डॉ.सौदागर वानखेडे, सुधाकर वानखेडे, गौतम लहाने, प्रवीण कळंबे ,पवन अवसरमोल, समाधान डोके, अजय बशिरे, देवानंद नरवाडे, संजय लहाने, जानकाबाई प्रधान, शोभाबाई प्रधान, मंजुळाबाई वाठोरे, अनिल चव्हाण खुरमपूर, अनिस शहा, विनोद अवसरमोल. उपस्थित होते.