

Buldhana Headmaster Suspended for Serving Mid-Day Meal on Waste Paper
Sakal
संग्रामपूर (बुलढाणा) : विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळणे मुख्याध्यापक लाचांगलेच भोवले.. विद्यार्थ्यांना रद्दी पेपरवर खिचडी दिल्या प्रकरणी मुख्याध्यापक निलंबीत झाल्याचा संग्रामपूर तालुक्यातील प्रकार समोर आला आहे. याला 21 नोव्हेंबर रोजी शिक्षण विभागाने दुजोरा दिला. आधीच जिल्हा परिषद शाळेची पट संख्या मोठ्या प्रमाणात घटत असताना, बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर या आदिवासी भागातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या जीवाशी कसा खेळ केला जात आहे.