buldhana
buldhana sakal

Buldhana Crime : बोगस सिमेंट विक्रीचा गोरखधंदा ९०० बॅग जप्त

नामांकित कंपन्याच्या नावाखाली हलक्या दर्जाचे सिमेंट विक्री होत आहे.

खामगाव नामांकित कंपनीच्या बॅगमध्ये सुमार दर्जाचे सिमेंट भरून विक्री करणाऱ्या एका रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला असून बर्डे प्लॉट व सजनपुरी भागातील तीन वेगवेगळ्या गोडावून मधून ९०० बॅग भेसळयुक्त बोगस सिमेंटसह या गोरखधंद्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

याप्रकरणी एक जण पोलिसांच्या ताब्यात असून, या रॅकेटमधील इतर आरोपींचा पोलिस शोध घेत आहेत.

खामगाव शहरात मागील अनेक दिवसांपासून बोगस व भेसळयुक्त सिमेंट बनविण्याचा गोरखधंदा सुरु आहे.

buldhana
Pune Hospitals : पुणे महापालिकेच्या रुग्णालयांची ‘तब्येत’ सुधारणार

नामांकित कंपन्याच्या नावाखाली हलक्या दर्जाचे सिमेंट विक्री होत आहे. एका नामांकित कंपनीच्या बॅगमध्ये सुमार दर्जाचे व कमी किमतीचे सिमेंट भरुन त्या बॅग सिलाई मशीनने पॅक करून विक्री केली जात असल्याची माहिती सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती.

त्या आधारे सदर कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गुप्त पध्दतीने या गोरखधंद्याचा शोध घेतला व संपूर्ण माहिती घेतल्यानंतर याबाबत पोलीसांकडे तक्रार केली. त्या आधारे शिवाजी नगर पोलीसांनी काल (ता.१) रात्री सजनपूरी भागातील एका गोडावूनवर छापा मारला.

यावेळी याठिकाणी पोलिसांना मोठया प्रमाणावर भेसळयुक्त बोगस सिमेंट तसेच इतर साहित्य आढळून आले. यावेळी पोलिसांनी हा गोरखधंदा करणारा मो. सुल्तान मो. हारुण (२७) याला ताब्यात घेतले.

त्याची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने आणखी दोन गोडावूनबद्दल माहिती दिली. त्याआधारे पोलिस पथकाने बर्डे प्लॉट भागातील दोन गोडावूनवर छापा मारला असता त्या ठिकाणी देखील भेसळयुक्त सिमेंट बनविण्याचे साहित्य व बोगस सिमेंट बॅग आढळून आल्या.

buldhana
Mumbai News : जमीनीच्या वादातून नेवाळीत शेतातच चुलत भावंड आपापसात भिडली

या तिन्ही गोडावून मधून पोलिसांनी एकूण ९०० बॅग भेसळयुक्त सिमेंट दर्जेदार कंपनीचे नाव व लोगो असलेल्या रिकाम्या ५ हजार पोतड्या, जाळी, पोतड्या पॅक करण्यासाठी वापरण्यात येणारी शिलाई मशीन, टोपले, फावडे असा एकूण ३ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी सदर कंपनीचे अधिकारी महेश अर्जुन मुखीया रा. मुंबई यांच्या तक्रारीवरून

buldhana
Akola news : प्रभारी अधिकारी आठवड्यातून दोनच दिवस हजर

मो. सुल्तान मो. हारुण याच्या विरुध्द गुन्‍हा दाखल केला असून, सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे, परिविक्षाधीन उपविभागीय पोलिस विवेक पाटील, पोलिस निरीक्षक अरुण परदेशी, पोउपनि वासाडे, पोउपनि विनोद खांबलकर, पोहेकाँ निलसिंग चव्हाण, देवेंद्र शेळके, संदीप टाकसाळ, सुधाकर थोरात, नापोकाँ संतोष वाघ, पोकों प्रविण गायकवाड यांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com