Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या गेटवरच घडला रक्तरंजित थरार; कव्वालीतील क्षुल्लक वादातून हाणामारी
Bloody horror right at the entrance of the police station; 7 seriously injured, tension in the city.

Bloody horror right at the entrance of the police station; 7 seriously injured, tension in the city.

Sakal

Updated on: 

देऊळगाव राजा/बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगाव राजा शहरात एकाच समाजाच्या दोन गटांमध्ये झालेल्या भीषण हाणामारीत दोघांचा जागीच मृत्यू झाला असून सात जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतकांमध्ये शिंदेसेनेचा एक विद्यमान नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) एका कार्यकर्त्याचा समावेश आहे. अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण रक्तरंजित संघर्ष थेट देऊळगाव राजा पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वारावरच घडला. दोन्ही बाजूंनी तलवारी आणि धारदार शस्त्रांनी एकमेकांवर सपासप वार केल्याने या दुहेरी हत्याकांडामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com