
बुलडाणा : शेतीच्या धुऱ्याचा वाद; एकाचा मृत्यू
धाड : शेतीच्या धुऱ्यावरुन वाद होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. यात एका शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सदरची घटना २९ जूनला बुलडाणा तालुक्यातील जनुना येथे घडली असून, ६ जुलैला सदर शेतकऱ्याचा उपचारादरम्यान औरंगाबाद येथे मृत्यू झाला. याप्रकरणी ७ जुलैला पोलिस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करत आरोपींना ताब्यात घेतले आहे.
धाड पोलिस स्टेशनअंतर्गत येत असलेल्या जनुना येथील अमोल शिवाजी पवार (वय २४) व मृतक दादाराव दगडू सरदार (वय ६०) यांची शेजारीशेजारी शेती आहे. शेतीचे मशागतीचे काम सुरू असताना २९ जूनला अमोल पवार व मृतक दादाराव सरदार यांच्यामध्ये धुऱ्याच्या कारणावरून वाद होऊन हाणामारी झाली. यात मृतक दादाराव सरदार यांना गंभीर मार लागला होता.
त्यावेळी अमोल पवार यांच्याविरोधात धाड पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. दादाराव सरदार यांना कुटुंबीयांनी औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल केले होते. दरम्यान, ६ जुलैला दादाराव सरदार यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दरम्यान, ७ जुलैला दादाराव सरदार यांचा मृतदेह घेऊन त्यांचे कुटुंब पोलिस स्टेशनला आले.
यावेळी त्यांच्या तक्रारीवरून आरोपी अमोल शिवाजी पवार व त्याची आई संगीता शिवाजी पवार यांच्याविरोधात खुनाचा गुन्ह्यासह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात येऊन आरोपींना अटक करण्यात आली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात पीआय अनिल पाटील करत आहे.
Web Title: Buldhana Dispute Agriculture Land Farmer Death During Treatment
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..