
तेल्हारा : सततची नापिकी, शेतमालाला भाव नाही. त्यामुळे उदरनिर्वाहचा निर्माण झालेला प्रश्न व कर्जाचा वाढता डोंगर, याला कंटाळून दोरीच्या साहाय्याने निंबाच्या झाडाला गळफास घेवून एका ६८ वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी, दि.१३ ऑगस्ट रोजी तालुक्यातील जस्तगाव येथे घडली.