
बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड संकटात असून आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभा आहे. वारंवार शासनाकडे मागणी करूनही मदत मिळत नाही, पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम आता आम्ही मेल्यावर देता का? असा संतप्त सवाल शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केला आहे.