RaviKant Tupkar : अन्यथा शेतकऱ्यांना घेऊन मुंबईच्या कार्यालयात घुसू; तुपकरांनी गाठले विमा कंपनीचे मुंबई कार्यालय
Crop Insurance : बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांना अजूनही २०२३-२४ च्या पीकविम्याची भरपाई मिळालेली नाही. यावर आक्रमक भूमिका घेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी विमा कंपनीला जाब विचारला आणि भरपाईची मागणी केली.
बुलडाणा : जिल्ह्यातील सन २०२३ व २०२४ चा हजारो शेतकऱ्यांचा पीकविमा अजूनही प्रलंबित आहे. नुकसान होऊनही अनेक शेतकरी पिकविम्याच्या लाभापासून वंचित असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे.