Buldhana Municipal Elections: बुलडाणा जिल्ह्यात ११ नगर पालिकांची निवडणूक; दिवाळीत प्रचाराचा धुराळानंतर उधळणार गुलाल
Municipal Elections : बुलडाणा जिल्ह्यात ११ नगर पालिकांच्या निवडणुका होणार आहेत. नगर विकास विभागाने निवडणूक प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले असून, १ सप्टेंबर रोजी प्रभागरचनेची अंतीम यादी प्रकाशित केली जाईल.
खामगाव : राज्यातील नगर पालिका निवडणुकांच्या अनुषंगाने शासनाच्या नगर विकास विभागाने प्रभागरचना आणि इतर प्रक्रियांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. बुलडाणा जिल्ह्यात ११ नगर पालिकांची निवडणूक होणार असून आता राजकीय हालचालींना देखील वेग आला आहे.