

Online Attendance
sakal
बुलडाणा : भारत सरकारच्या विद्या समिक्षा केंद्र (व्हीएसके) या ऑनलाइन प्रणालीवर उपस्थिती नोंदविण्यात बुलडाणा जिल्ह्याने राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे. चॅटबोटव्दारे विद्यार्थ्यांची दैनिक उपस्थिती नोंद करण्यासाठी केंद्रीय शिक्षण विभागाने ही प्रणाली कार्यान्वित केली असून, राज्यातील सर्व शासकीय व अनुदानीत शाळांसाठी लागू करण्यात आलेली आहे.