
बुलढाण्यात आंदोलन करणाऱ्या प्रकल्पग्रस्त आंदोलनकर्त्यानं पूर्ण नदीत उडी मारली होती. त्या आंदोलनकर्त्याचा मृतदेह ४४ तासानंतर आंदोलनाच्या ठिकाणापासून १४ किमी अंतरावर आढळून आला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे जीव गेल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. या घटनेत जिल्हा प्रशासन दोषी असल्याचा आरोप मृत्यू झालेल्या आंदोलनकर्त्या शेतकऱ्याच्या पतीनं केलाय. प्रशासनाकडून अद्याप कोणत्याही मदतीची घोषणा करण्यात आली नाहीय. ५० लाखांची आर्थिक मदत आणि कुटुंबातील एकाला सरकारी नोकरी द्यावी अशी मागणी नागरिकांनी केलीय.