Buldhana Crime: जिवंत मुलीच्या हत्या प्रकरणी २२ दिवस पिता-पुत्र कारागृहात, पोलिसांची उचलबांगडी

Father and Son Released After 22 Days in Jail: अकोला जिल्ह्यातील गाजलेल्या हत्या प्रकरणात जिवंत मुलीला मृत समजून अटक करण्यात आलेल्या पिता-पुत्रांची २२ दिवसांनंतर सुटका झाली.
Buldhana Crime

Buldhana Crime

esakal

Updated on

जळगाव जामोद: राजुरा शिवारातील महिलेच्या हत्येच्या आरोपात पोलिसांनी अटक केलेल्या पिता-पुत्रास न्यायालयाने दोषमुक्त केल्यानंतर शनिवारी (ता.३०) सकाळी दोघांची सुटका करण्यात आली. तसेच तपासात कसूर व बेजबाबदारपणा केल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलिस अधिक्षकांनी एलसीबी प्रमुखासह जळगाव जामोद ठाणेदाराची तडकाफडकी उचलबांगडी करत त्यांची मुख्यालयी सलग्न केले. मात्र, शिरच्छेद झालेला 'तो' मृतदेह नेमका कुणाचा याचा अद्यापही थांगपत्ता लागलेला नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com