esakal | ‘वहिनीला मुलगी झाली, माझ्या मुलीचे लाड होणार नाही’; नंदेने जिवंत जाळले
sakal

बोलून बातमी शोधा

‘वहिनीला मुलगी झाली, माझ्या मुलीचे लाड होणार नाही’; नंदेने जिवंत जाळले

‘वहिनीला मुलगी झाली, माझ्या मुलीचे लाड होणार नाही’; नंदेने जिवंत जाळले

sakal_logo
By
सतीश पुल्लजवार

पांढरकवडा (जि. यवतमाळ) : वहिनीला मुलगी झाल्यामुळे आता माझ्या मुलीचे लाड होणार नाही, हा राग मनात धरून बाळंतीण वहिनीच्या अंगावर तेल टाकून जिवंत जाळल्याची दुर्दैवी घटना यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर तालुक्यातील दातपाडी गावात घडली आहे. मोनिका गणेश पवार असे उपचारा दरम्यान मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. (Burned-alive-crime-in-Yavatmal-Murder-in-Yavatmal-Crime-News-nad86)

प्राप्त माहितीनुसार, केळापूर तालुक्यातील दातपाडी येथील गणेश पवार याच्याशी सहा वर्षांपूर्वी मोनिका हिचे लग्न झाले. सासरच्या मंडळीकडून चांगली वागणूक मिळत असतानाच मोनिका हिची नणंद कांता पवार कोणत्या ना कोणत्या कारणाने तिच्याशी नेहमीच वाद घालत होती. मोनिका हिला चार वर्षांचा मुलगा आहे. ४ जुलै रोजी तिने एका मुलीला जन्म दिला. मोनिका हिने मुलीला जन्म दिल्यामुळे माझ्या मुलीचे लाड होणार नाही या ईर्षेपोटी नणंद कांता राठोड हिने मोनिका सोबत चांगलाच वाद घातला.

हेही वाचा: भाजपसाठी धोक्याची घंटा? कोअर कमिटीची तातडीची बैठक

काहीवेळा नंतर मोनिका बाथरूममध्ये गेली तेव्हा तिची नणंद रुमच्या दाराजवळ उभी होती. बाथरूममधून बाहेर येताच कांता राठोड हिने पाठीमागून अंगावर तेल घालून मोनिकाला पेटवून दिले. यामध्ये ती जवळपास अंशी टक्के जळाली. अतिशय गंभीर अवस्थेत मोनिकाला उपचारासाठी सेवाग्राम येथे दाखल करण्यात आले. मात्र, दहा दिवसांच्या उपचारानंतर १७ जुलैला तिचा मृत्यू झाला. घटनेची फिर्याद पोलिस ठाण्यात दाखल होताच पोलिसांनी महिलेस ताब्यात घेतले आहे.

(Burned-alive-crime-in-Yavatmal-Murder-in-Yavatmal-Crime-News-nad86)

loading image