अगरबत्ती व्यवसायालाही लॉकडाउनचा फटका, कसे भरावे पोट?

Business of incense stick towards doom due to lockdown
Business of incense stick towards doom due to lockdown
Updated on

सडक अर्जुनी (जि. गोंदिया) : तालुक्‍यातील वडेगाव येथे अगरबत्तीचा व्यवसाय गत 25 वर्षांपासून केला जात आहे. मात्र, लॉकडाउनमुळे हा व्यवसाय यंदा ठप्प झाला आहे. दिवसाकाठी जवळपास 70 हजार अगरबत्तींचा सुगंध जागेवरच थांबला आहे. उत्पादकांचे हात लॉक झाल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्‍नही गंभीर झाला आहे. 

सडक अर्जुनीपासून दोन किलोमीटर अंतरावर वडेगाव हे गाव आहे. मागील 25 वर्षांपूर्वीची ही परंपरा आजही येथे कायम आहे. पूर्वी सहा ते सात कुटुंब या व्यवसायात होते. सद्यःस्थितीत तीन ते चार कुटुंब अगरबत्ती तयार करून कुटुंबांचा गाडा पुढे रेटत आहेत. बदलत्या काळानुसार तीन वर्षांपासून देवचंद खोब्रागडे, शरद राऊत, मीनानाथ नंदेश्‍वर हे यंत्राद्वारे अगरबत्ती तयार करीत आले आहेत. हे कुटुंब एका दिवसाला 40 ते 50 किलो म्हणजेच 70 हजारांच्या जवळपास उत्पादन घेत आले आहेत. अगरबत्ती तयार करण्यासाठी गोंदिया, नागपूरवरून काडी, कोळसा पावडर, भुसा पावडर, मैदा पावडर, सेंट, ऑइल, पॉकेट लेबल, प्लॅस्टिक, कागद आदी कच्चा माल विकत आणत होते. त्यानंतर घरीच अगरबत्ती तयार करून पॅकिंग झालेला माल सडक अर्जुनी, देवरी, नवेगावबांध येथील बाजारात थोक व चिल्लर भावाने विकत होते. किराणा दुकानातदेखील ठोक भावाने विक्री करीत होते. मात्र, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर अवकळा आली आहे. 
अगरबत्ती तयार करण्याच्या कामात कुटुंबातील सगळे सदस्य गुंतलेले असतात. तीन दिवस बाजारात विक्री तर, चार दिवस घरी अगरबत्ती तयार करण्याचे काम करतात. मात्र, सद्यःस्थितीत हा व्यवसाय ठप्प पडला असून, उदरनिर्वाहाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे.

कुटुंबाचा गाडा कसा हाकावा?

लॉकडाउनमुळे कच्चामाल आणण्यासाठी नागपूर, गोंदियाला जाता येत नाही. साहित्य उपलब्ध नसल्याने नवीन माल तयार करता येत नाही. आठवडी बाजारदेखील बंद आहेत. लॉकडाउनच्या पूर्वी जो काही तयार केलेला जुना पक्का माल होता तो एखाद्या दुकानदाराने मागणी केल्यास पोहोचवून देतो. आता पक्का माल नाही. कुटुंबाचा गाडा कसा चालवावा हा प्रश्‍न आहे. 
देवचंद खोब्रागडे,अगरबत्ती व्यावसायिक,वडेगाव. 

सारा व्यवसाय ठप्प झाला हो! 

लॉकडाउनपूर्वी दिवसाला 70 हजार अगरबत्तीचे उत्पादन होत होते. परंतु, लॉकडाउननंतर परिस्थितीत बदल झाला. कच्चा माल मिळणे कठीण झाले. त्यामुळे अगरबत्ती तयार करता येत नाही. सारा व्यवसाय थांबला आहे. पोटापाण्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे, अशी खंत वडेगाव येथील अगरबत्ती व्यावसायिकांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com