esakal | बुधवारपासून तुरीची शासकीय खरेदी; शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, जिल्ह्यात सहा केंद्रे
sakal

बोलून बातमी शोधा

buying of red gram starting from Wednesday

शेतकऱ्यांनी तूर नोंदणीकरिता खरीप हंगाम 2020-21 मधील पीकपेरा नोंद असलेला तलाठ्याचा सहीशिक्‍क्‍यानिशी ऑनलाइन सातबारा, आधारकार्डची छायांकित प्रत, बॅंक पासबुक प्रत खरेदी केंद्रावर सोबत आणणे आवश्‍यक आहे.

बुधवारपासून तुरीची शासकीय खरेदी; शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, जिल्ह्यात सहा केंद्रे

sakal_logo
By
क्रिष्णा लोखंडे

अमरावती ः केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप हंगाम 2020-21 या वर्षात तूरखरेदीस बुधवारपासून (ता.20) सुरुवात होणार आहे. तुरीची नोंदणी ऑनलाइन पद्धतीने 28 डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. तूर नोंदणीसाठी जिल्ह्यात सहा खरेदी केंद्रे निश्‍चित करण्यात आली असून शेतकऱ्यांनी तालुक्‍याच्या केंद्राच्या ठिकाणी संपर्क साधून तुरीची नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी श्रीमती के. पी. धोपे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी तूर नोंदणीकरिता खरीप हंगाम 2020-21 मधील पीकपेरा नोंद असलेला तलाठ्याचा सहीशिक्‍क्‍यानिशी ऑनलाइन सातबारा, आधारकार्डची छायांकित प्रत, बॅंक पासबुक प्रत खरेदी केंद्रावर सोबत आणणे आवश्‍यक आहे. बॅंक पासबुकवर शेतकऱ्याचे नाव, खाते क्रमांक, आयएफसी कोड स्पष्ट नमूद असावा तसेच जनधन खाते किंवा पतसंस्थेतील खाते क्रमांक सादर करू नये, अशा सूचना विभागाने दिल्या आहेत. शासकीय खरेदी 20 जानेवारीपासून सुरू होणार आहे.

नक्की वाचा - जन्मदाता बापच करत होता घृणास्पद कृत्य; अखेर दिरानं उचलला विडा अन् घडला थरार

जिल्ह्यातील तूरखरेदी केंद्र

अचलपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी मधुकरराव टवलारकर व्यापारसंकुल, सिव्हिल लाइन, परतवाडा तालुका खरेदी-विक्री संघ, अचलपूर येथे नोंदणी करावी. चांदूररेल्वे तालुक्‍याच्या शेतकऱ्यांनी स्टेट बॅंकेसमोर, धनराजनगर तालुका खरेदी-विक्री संघ, चांदूररेल्वे, दर्यापूर तालुक्‍यात अकोट रोड, तालुका खरेदी-विक्री संघ दर्यापूर, तसेच धारणी तालुक्‍यात सहकार भवन तालुका खरेदी-विक्री संघ धारणी इथे आहे. 

नांदगावखंडेश्‍वर तालुक्‍यात डॉ. इंगळे यांच्या दवाखान्याजवळ तालुका खरेदी-विक्री संघ नांदगाव खंडे., तिवसा तालुक्‍यात आझाद चौक, डॉ. भाऊसाहेब पंजाबराव देशमुख, तालुका खरेदी-विक्री संघ, तिवसा याठिकाणी संबंधित तालुक्‍यातील व तालुक्‍याला जोडलेल्या तूरखरेदी केंद्राच्या ठिकाणी तूर हमीभावाने खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांनी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

संपादन - अथर्व महांकाळ