esakal | सावधान! ‘और क्या चल रहा है, ... चल रहा है’; मागविला कॅमेरा आणि मिळाले स्प्रे

बोलून बातमी शोधा

Camera ordered online and got Dio spray Amravati crime news}

दुसऱ्या दिवशी कंपनीचे वितरण प्रतिनिधी श्री. काळबांडे यांनी डॉ. पसारी यांच्याशी संपर्क साधून पार्सल उघडताना सीसीटीव्हीचे व्हिडिओ सोबत घेऊन गेले. पाच दिवसांच्या चौकशी प्रक्रियेनंतर सदर कंपनीने आम्ही काहीही करू शकत नाही.

सावधान! ‘और क्या चल रहा है, ... चल रहा है’; मागविला कॅमेरा आणि मिळाले स्प्रे
sakal_logo
By
सायराबानो अहमद

धामणगावरेल्वे (जि. अमरावती) : कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे घरबसल्या ऑनलाइन शॉपिंग करण्यावर अनेकांचा भर आहे. परंतु, ऑनलाइन शॉपिंगमध्ये एका डॉक्‍टराची ३८ हजारांनी फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांनी कॅमेरा बोलविला होता. मात्र, त्यांना पार्सलद्वारे डियो स्प्रे मिळाले. या प्रकारामुळे त्यांना धक्काच बसला.

येथील गांधी चौकातील डॉक्‍टर असित श्‍यामसुंदर पसारी यांनी एका कंपनीकडे ३८ हजार रुपये किंमतीच्या कॅमेऱ्याची ऑर्डर ऑनलाइन दिली होती. योग्य कालावधीनंतर स्थानिक वितरण प्रतिनिधी पंकज काळबांडे यांनी डॉ. पसारी यांना पार्सल आणून दिले. अल्पावधीतच डॉ. असित पसारी यांनी आलेले पार्सल उघडले असता त्यात पाच डियो स्प्रे निघाले. फसगत झाल्याचे लक्षात येताच डॉ. पसारी यांनी सदर कंपनीच्या ग्राहक संपर्क केंद्राशी संपर्क साधून तक्रार नोंदविली. त्या वेळेस चौकशी करून सांगतो, असे ग्राहक केंद्राने सांगितले.

जाणून घ्या - Alert : आज रात्रीपासून ३४ तासांची संचारबंदी

दुसऱ्या दिवशी कंपनीचे वितरण प्रतिनिधी श्री. काळबांडे यांनी डॉ. पसारी यांच्याशी संपर्क साधून पार्सल उघडताना सीसीटीव्हीचे व्हिडिओ सोबत घेऊन गेले. पाच दिवसांच्या चौकशी प्रक्रियेनंतर सदर कंपनीने आम्ही काहीही करू शकत नाही, परतही घेणार नाही आणि परतावा देखील देणार नाही, असे म्हणत हात वर केल्याचा आरोप डॉ. पसारी यांनी केला आहे. ऑर्डर देतानाच पैशांचा भरणा ऑनलाइन पद्धतीने करण्यात आल्याचे डॉ. पसारी यांनी सांगितले.