
कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पुढील आदेश येईपर्यंत दर शनिवारी रात्री ८ वाजतापासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे आज शनिवारी रात्री ८ वाजतापासून जिल्ह्यात संचारबंदीला सुरूवात होईल.
अकोला : कोरोना संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी पुढील आदेश येईपर्यंत दर शनिवारी रात्री ८ वाजतापासून सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदीचे आदेश जारी केले आहेत. त्यामुळे आज शनिवारी रात्री ८ वाजतापासून जिल्ह्यात संचारबंदीला सुरूवात होईल.
या काळात वाहनातून प्रवास करताना प्रवाशी संख्येवर मर्यादा, गर्दीच्या ठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन या व अन्य बाबींवर जोर देण्यात येईल.
हेही वाचा - आर.आर.आबा सुंदरगांव पुरस्कारात सावळा गोंधळ
जिल्ह्यात मार्च २०२० पासून कोरोना विषाणूने धुमाकूळ घातला आहे. सुरूवातीला महानगरात आढळलेले कोरोना विषाणूग्रस्त नंतरच्या काळात ग्रामीण भागात सुद्धा आढळले. त्यामुळे जुलै महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना विषाणूने थैमानं घातलं आहे. सप्टेंबर महिन्यात तर कोरोनाचा आलेख उच्चांकीवर होता.
नंतरच्या काळात मात्र कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली. त्यामुळे रेड झोन मध्ये असलेला जिल्हा ग्रीन झोनमध्ये गेला. परंतु आता फेब्रुवारी २०२१ च्या सुरुवातीपासून जिल्ह्यात कोरोना ग्रस्तांची संख्या वाढत आहे.
हेही वाचा - मन हेलावून टाकणारी घटना; मळणी यंत्रात अडकला तरूण, गतिमंद भावासह विधवा आईवर कोसळला दुखःचा डोंगर
त्यामुळे प्रशासनामार्फत युद्ध स्तरावर उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याअंतर्गत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी पुढील आदेश जारी करेपर्यंत जिल्ह्यात प्रत्येक रविवारी (शनिवारचे रात्री ८ वाजता पासून सोमवारचे सकाळी ६ वाजेपर्यंत) संपूर्ण संचारबंदी लागू करण्याचे आदेश दिले आहेत.
या कालावधीत कोणत्याही व्यक्तीस मुक्त संचार करता येणार नाही. परंतु ठोक भाजीपाला विक्री, दुध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करणाऱ्या डेअरी, रेल्वेने तसेच एस.टी. बस व प्रायव्हेट लक्झरीने उतरणाऱ्या प्रवाश्यांकरिता ऑटोरिक्शा सेवा देणाऱ्यांना संचारबंदीच्या नियमातून सुट देण्यात आली आहे.
अकोला, बुलढाणा, वाशिम जिल्ह्यातील ताज्या बातम्या - क्लिक करा संपादन - विवेक मेतकर
|
|||