नागपुरी तोफांचे लाहोर कनेक्‍शन

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 19 October 2019

नागपूर : कस्तुरचंद पार्कच्या खोदकामात चार तोफा सापडल्यानंतर आम्ही विभागीय आयुक्तालयात असलेल्या तोफांचे निरीक्षण केले. प्रथमदर्शनी दोन्ही तोफांमध्ये साम्य आढळून आलेले नाही. पण विभागीय आयुक्तालयात ठेवण्यात आलेल्या तोफांसारखी एक तोफ लाहोर संग्रहालयात आहे. त्यामुळे आयुक्तालयात या तोफा कुठून आल्या, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. 

विभागीय आयुक्‍तालयातील चाके असलेल्या तोफांना पारशी भाषेत झमझमा तोफ तर भारतीय भाषेत भांगीनवाली तोफ म्हटले जात होते. या तोफा सुमारे 1757 साली तयार झाल्या असून, अशीच राजा हरीसिंह यांच्या काळातील एक तोफ लाहोर येथील संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. विभागीय आयुक्तालयात तीन तोफा ठेवण्यात आल्या आहेत. यापैकी मधल्या भागात असलेली तोफ सुमारे 12 ते 15 फूट लांब असून, दोन टन वजनी आहे. या तोफेवर अरबी पद्धतीचे सुबक नक्षीकाम असून, मोडीभाषेत संपूर्ण माहिती कोरलेली आहे. विशेष म्हणजे जवळ जाऊन बघितल्यास तोफेच्या आत एक गोळादेखील असल्याचे निदर्शनात येते. पण महत्त्वाचे म्हणजे या तोफेवर ब्रिटिश तोफेप्रमाणे कोणताही क्रमांक नाही. 
दोन बाजूस असलेल्या दोन तोफा ब्रिटिश पद्धतीच्या असून त्यांच्यावर क्रमांक कोरण्यात आलेले आहेत. या तोफादेखील खोदकामात सापडलेल्या तोफांप्रमाणे ब्रिटिश राणीचा मुकुट व लोगो व चौदाव्या शतकात जगप्रसिद्ध झालेल्या सर गवाईन या लेखकाने रचलेल्या कवितेची ओळ कोरण्यात आली आहे. विशेष म्हणजे "जो वाईट विचार करेल त्यालाच लाज वाटेल' असा त्या कवितेतील ओळीचा अर्थ आहे. 
विभागीय आयुक्‍तालयातून माहिती गहाळ? 
गुरुवारी कस्तुरचंद पार्क येथे चार मोठ्या व दोन छोट्या अशा सहा तोफा सापडल्या. त्यानंतर विभागीय आयुक्‍तालयात असलेल्या तोफांची अनेकांना आठवण झाली. महत्त्वाचे म्हणजे या तोफांची माहिती विभागीय आयुक्‍तालयासह बांधकाम विभागाकडे व पुरातत्त्व विभागाकडेदेखील उपलब्ध नसल्याने, त्या नेमक्‍या केव्हाच्या व कोणाच्या आहेत, हा प्रश्‍न आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cannnon, lahore connection