अधिवास शोधण्यासाठी ती भटकंती करीत असावी,तिला सोडा; तज्ज्ञांचा सूर  

राजेश रामपूरकर
Monday, 28 September 2020

येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याने वनमंत्री संजय राठोड यांनी नुकतीच भेट दिली होती. दरम्यान, वनमंत्र्यांनी वाघिणीला जंगलात मुक्त करता येईल का याबाबतही चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र, समितीच्या बैठकीनंतरच योग्य निर्णय घेण्यात येईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. जेरबंद वाघिणीच्या पुढील भविष्याचा निर्णय घेण्यासाठी झालेल्या बैठकीत अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पूर्व) बी.एस. हुडा, सेवानिवृत्त वनाधिकारी गिरीश वरिष्ठ, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते, किशोर रिठे आण डॉ. शिरीष उपाध्ये उपस्थित होते.

नागपूर  यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा वनपरिक्षेत्रातून जेरबंद केलेली वाघिणीला (टी २ सी १) मुक्त अधिवासात सोडण्यात यावे असा सुर आज झालेल्या तज्ज्ञांच्या बैठकीतून निघाल्याचे माहिती पुढे आली आहे. वन विभागाने स्थापन केलेल्या राज्यस्तरीय समितीच्या बैठकीमध्ये वाघिणीला सोडण्याबाबतसह इतरही मुद्द्यावर चर्चा करण्यात आली. मात्र, काही कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्यावर ठाम निर्णय होऊ शकला नसल्याचे कळते.   

येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये ठेवण्यात आल्याने वनमंत्री संजय राठोड यांनी नुकतीच भेट दिली होती. दरम्यान, वनमंत्र्यांनी वाघिणीला जंगलात मुक्त करता येईल का याबाबतही चर्चा केल्याची माहिती आहे. मात्र, समितीच्या बैठकीनंतरच योग्य निर्णय घेण्यात येईल असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. जेरबंद वाघिणीच्या पुढील भविष्याचा निर्णय घेण्यासाठी झालेल्या बैठकीत अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक (पूर्व) बी.एस. हुडा, सेवानिवृत्त वनाधिकारी गिरीश वरिष्ठ, राज्य वन्यजीव मंडळाचे सदस्य कुंदन हाते, किशोर रिठे आण डॉ. शिरीष उपाध्ये उपस्थित होते.

‘लस’ वाहून नेताना तापमान स्थिर, स्मार्ट हेल्थ केअरसाठी पोर्टेबल व्हॅक्सिन कोल्ड बॉक्स

दरम्यान, सर्वच सदस्यांनी वाघिणीचा काहीही दोष नाही, तिने जंगलाच्या शेजारीच ५०० मीटर अंतरावर महिलेवर हल्ला करून तिला ठार मारले आहे. याशिवाय इतर कोणती घटना घडलेली नाहीत. ती वाघीण अधिवास शोधण्यासाठी भटकंती करीत असावी असा सुर निघाला. तिला जंगलात मुक्त करून संधी द्यावी. मात्र, वाघिणीच्या मागोवा घेतलेले कागदपत्रे, कॅमेरा ट्रॅपचे फुटेज उपलब्ध नाहीत. असा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे ठोस निर्णय झालेला नसून त्या कागदपत्रांची पाहणी केल्यानंतरच ठोस निर्णय घेतला जाणार असल्याचे बोलले जात आहे.

पालकांनो सावधान! मुलांवर कधीही हात उगारू नका; नाही तर भोगावे लागतील भयंकर परिणाम

वाघिणी जखमी असून तिच्यावर उपचार करण्यात येत आहे. ती जखम व्यवस्थित होण्यासाठी आठ दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. वाघिणीला दुसऱ्या दिवशी खाण्यासाठी कोंबडी टाकली होती. वाघिणीने तिला मारले मात्र, खाल्ले नाही. तिसऱ्या दिवसापासून त्याने थोडे फार खाणे सुरू केलेले आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Captured Tigress Released Forest ?