esakal | सावधान! पोलिसांची नजर तुमच्यावर; खावी लागणार कारागृहाची हवा
sakal

बोलून बातमी शोधा

murtizapur.jpg

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता केंद्र, राज्य व जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या विविध उपाय योजनांच्या प्रभावी अमलबजावणीसाठी पोलिस प्रशासन अविरत कार्यरत आहे. विशेषतः कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या पोलिस विभागाच्या प्रमुख जबाबदारीच्या अनुषंगाने सामाजिक माध्यमांवरील संदेश व मजकुरावर पोलिस विभागाचे पूर्ण लक्ष असल्याचे नमुद करणारा हा फतवा मूर्तिजापूर शहर, ग्रामीण, बार्शीटाकळी, बोरगाव मंजू, पिंजर व माना पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सर्वसामान्य जनतेला योग्य निर्देश देतो

सावधान! पोलिसांची नजर तुमच्यावर; खावी लागणार कारागृहाची हवा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मूर्तिजापूर (जि. अकोला) : व्हॉटस् ॲप, फेसबुक सारख्या सामाजिक माध्यमांवरून केल्या जाणाऱ्या कुठल्याही आक्षेपार्ह चुकीला माफी नसून कारागृहाची हवा अन् लाखाचा दंड ठोठावण्याची तरतूद असणारा फतवा येथील उप विभागीय पोलिस अधिकारी कार्यालयातून रविवारी (ता.5) निघाला आहे. एसडीपीओंच्या स्वाक्षरीनिशी बाहेर पडलेल्या या आदेशानुसार महाराष्ट्र सामाजिक बाहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) कायदा 2016 च्या कलम 5 व 7 अन्वये तीन वर्षे कारावास व 1 लाख रुपये दंड ठोठावला जाईल.

हेही वाचा- विदर्भातील कोरोना नमुन्यांची तपासणी एम्स, आयजीएमसीमध्ये

पोलिसांची नजर तुम्हच्या मोबाईलवर
भारतीय दंड संहितेच्या 153 (अ), (ब), 295 (अ), 298, 505, 107 कलमान्वये सामाजिक मामावरून कोणतीही अफवा पसरविल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 54 तसेच भादवी 505 (2), 188, म.पो.अधिनियम 1051 चे कलम 140 प्रमाणे गुन्हा दाखल केला जाईल. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता केंद्र, राज्य व जिल्हा प्रशासनाने हाती घेतलेल्या विविध उपाय योजनांच्या प्रभावी अमलबजावणीसाठी पोलिस प्रशासन अविरत कार्यरत आहे. विशेषतः कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या पोलिस विभागाच्या प्रमुख जबाबदारीच्या अनुषंगाने सामाजिक माध्यमांवरील संदेश व मजकुरावर पोलिस विभागाचे पूर्ण लक्ष असल्याचे नमुद करणारा हा फतवा मूर्तिजापूर शहर, ग्रामीण, बार्शीटाकळी, बोरगाव मंजू, पिंजर व माना पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील सर्वसामान्य जनतेला योग्य निर्देश देतो.

धर्म, जातीत तेढ निर्माण करणारे, जाती, धर्मावर बहिष्कार टाकण्याबाबत चिथावणी देणारे संदेश फेसबुक, व्हॉटस् ॲप वरून प्रसारीत करणे, त्यावर प्रतिक्रीया देणे, स्टेट्‍स ठेवणे या प्रकारच्या कृत्यांसाठी गंभीर गुन्ह्यांची नोंद करणारे कायदे स्पष्टपणे उल्लेखीत असणाऱ्या या फतव्यातून सामाजिक माध्यमांवरून संदेश प्रसारित करताना, स्टेट्स ठेवताना असे गुन्हे घडणार नाहीत याबाबत दक्ष असण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ग्रुप ॲडमीनने गृपमधील सदस्यांना सूचना द्याव्यात, शिवाय सेटींग मध्ये जाऊन गृप ॲडमीन संदेश पाठवेल, अशी व्यवस्था करून घ्यावी, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

loading image