
या प्रकरणी तलाठी गजानन सुरोशे यांनी उमरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अविनाश चव्हाण याच्यासह अन्य सहा जणांविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला होता.
उमरखेड (जि. यवतमाळ) : अवैध वाळूवाहतुकीला आळा घालण्यास गेलेल्या नायब तहसीलदारांसह तलाठ्यावर वाळूतस्करांनी केलेल्या प्राणघातक हल्लाप्रकरणात सहा जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत, तर मुख्य आरोपी अजूनही फरार आहे. उमरखेड येथे शनिवारी (ता.२३) रात्री ही घटना घडली होती.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
विशाल चव्हाण, वसीम खान रशीद खान, अनिल काळे, विकास बन, दीपक चव्हाण, वैभव उर्फ बाळू वानखेडे अशी अटकेतील संशयित मारेकऱ्यांची नावे आहेत. मास्टरमाईंड असलेला अविनाश चव्हाण याच्यासह बिरला नावाचा व्यक्ती फरार आहे. अवैध वाळूवाहतुकीला आळा घालत असताना नायब तहसीलदार वैभव पवार व तलाठी गजानन सुरोशे यांच्यावर चाकूहल्ला करण्यात आला होता. यात नायब तहसीलदारांना गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी तलाठी गजानन सुरोशे यांनी उमरखेड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अविनाश चव्हाण याच्यासह अन्य सहा जणांविरुद्घ गुन्हा नोंदविण्यात आला होता.