esakal | महाराष्ट्र अंनिसचा आरोप; संजय राठोड यांच्या पाठीशी जातपंचायत?

बोलून बातमी शोधा

Caste Panchayat with Sanjay Rathores back}

विशेष करून स्त्रियांच्या विरोधातील प्रकरणांमध्ये जातपंचायत नेहमी सक्रिय होते. याच दृष्टिकोनातून पूजा चव्हाण प्रकरण बघता जातपंचायत सक्रिय झाली आहे. एकीकडे संजय राठोड यांची चौकशी सुरू असताना जातपंचायतीने परस्पर संजय राठोड यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

vidarbha
महाराष्ट्र अंनिसचा आरोप; संजय राठोड यांच्या पाठीशी जातपंचायत?
sakal_logo
By
केतन पळसकर

नागपूर : पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणात बंजारा जातपंचायत सक्रिय झाली आहे. शिवसेनेचे माजी वनमंत्री संजय राठोड यांना वाचविण्याचा त्यांच्या वतीने आटोकाट प्रयत्न होत आहे, असा आरोप महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केला आहे. यावर महाराष्ट्र अंनिसच्या जातपंचायत मूठमाती अभियानाने आक्षेप घेतला आहे. याविरोधात अंनिसतर्फे लवकरच राज्यभर प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे. पोलिसांमध्ये तक्रारसुद्धा दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार यांनी दिली.

विदर्भातील वाशीम, यवतमाळ, अमरावती अशा अनेक जिल्ह्यांमध्ये बंजारा समाजाचे वास्तव्य आहे. संविधान लागू होण्यापूर्वीपासूनच समाजातील प्रत्येक जातीतील जातपंचायत सक्रिय आहे. सार्वजनिक जीवन वगळल्यास संविधानातील कायदे जातपंचायत समिती मानत नाहीत. समितीतील पंचांचे आदेशच केंद्रस्थानी असतात.

अधिक वाचा - नातेवाईकांच्या घरी पाहुणचार आटोपून परतीला निघाली महिला, रेल्वे स्थानकावर पोहोचली अन् सर्वच संपलं

विशेष करून स्त्रियांच्या विरोधातील प्रकरणांमध्ये जातपंचायत नेहमी सक्रिय होते. याच दृष्टिकोनातून पूजा चव्हाण प्रकरण बघता जातपंचायत सक्रिय झाली आहे. एकीकडे संजय राठोड यांची चौकशी सुरू असताना जातपंचायतीने परस्पर संजय राठोड यांना पाठिंबा जाहीर केला आहे. या जातपंचायतीविरोधात महाराष्ट्र अंनिस एकवटली आहे.

पंचांना अटक करावी 
महाराष्ट्र अंनिसच्या पुढाकारातून जातपंचायत बहिष्कृत कायदा २०१७ साली अस्तित्वात आला. याद्वारे संविधानाला धरून नसलेल्या प्रत्येक समाजातील या जातपंचायतीवर कारवाई सुरू झाली. या जातपंचायती संविधानाच्या विरोधात आहेत. शिवसेनेचे आमदार संजय राठोड यांच्या प्रकरणामध्ये बंजारा समाजातील जातपंचायतीने तोंड वर काढले आहे. 
- गजेंद्र सुरकार,
राज्य प्रधान सचिव, महाराष्ट्र अंनिस