कोळसा अफरातफरीची सीबीआयकडून चौकशी, थेट कोलारपिंपरी कोळसाखाणीत पोहोचलं पथक

CBI inquiry of coal scam in wani of yavatmal
CBI inquiry of coal scam in wani of yavatmal
Updated on

वणी (जि. यवतमाळ) : येथील 'वेकोलि'च्या वणी उत्तर क्षेत्रातील कोलारपिंपरी कोळसा खाणीत एक हजार टन कोळशाच्या अफरातफरप्रकरणी झालेल्या तक्रारीवरून सीबीआय व दक्षता (व्हिजिलन्स) पथक शुक्रवारी (ता.१२) कोलरपिंपरीत दाखल झाले. वृत्त लिहेपर्यंत कारवाई सुरूच होती. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही. 

कोलार पिंपरी कोळसा खाणीत काही दिवसांपूर्वी ९६८ टन कोळशाची अफरातफर झाली होती. याप्रकरणी नियमाला बगल देत अल्पदंडात्मक कारवाई करण्यात आली होती. कोलइंडिया व वेकोलिने उत्खनन केलेल्या कोळशाच्या वितरणाबाबत नियमावली तयार केली आहे. सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंतच कोळसा खाणीतील काट्यावरून ट्रक भरण्यात येतात. मात्र, कोलारपिंपरी कोळसा खाणीत नियमांची पायमल्ली करण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत ट्रक भरण्यात येत आहेत.अशा तक्रारी होत्या. या तक्रारीच्या चौकशीसाठी शुक्रवारी (ता.१२) केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) व दक्षता विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोलरपिंपरी कोळसा खाणीत छापासत्र अवलंबले. 

अधिकाऱ्याकडून कारवाईला दुजोरा - 

सीबीआय व व्हिजिलन्सच्या छापासत्राबाबत वेकोली उत्तर क्षेत्राचे महाप्रबंधक ईश्वरदास जक्‍यानी यांना विचारणा केली असता, त्यांनी कारवाईला दुजोरा देत व्यस्त असल्याचे सांगून माहिती देण्याचे टाळले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com