पैशानेच पळविला पैसा, रफुचक्कर चोर सीसीटीव्हीत कैद (व्हिडीओ पहा)

CCTV found fifty thousand runaway
CCTV found fifty thousand runaway

धाड (जि.बुलडाणा) : पैशाचा मोह कुणाला पडत नाही! पण, त्याची किंमतही जबर मोजावी लागते. दीड लाखाच्या मोहापायी जवळचे एकोणपन्नास हजार रुपये गमावण्याची वेळ बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथील एक व्यक्तीवर आली. पैसे समजून हाती आलेले कागदाचे पुडके बघून ‘तेल गेले, तुप गेले, हाती धुपाटणे आले’ या म्हणीचा प्रत्यय त्याला आला अन् डोक्यावर हात मारण्याशिवाय दुसरा पर्यायही उरला नाही.


बुलडाणा तालुक्यातील ग्रामीण भाग म्हणून ओळखल असलेले धाड हे लोकसंख्येने मोठे गाव. येथे भारतीय स्टेट बँकेची शाखा असून लगतच्या 20 ते 25 खेड्याचा कारभार चालतो. या छोट्याशा गावात नियोजनबद्ध आखणी करून एकाला पैशाचे आमिष दाखवीत त्याकडील 49 हजाराची रक्कम लुटण्याचा मंगळवारी (ता.19) दुपारी 12 वाजेदरम्यान घडला.

येथील अनिल धोंडूबा विसपुते (वय 42) हा मंगळवारी (ता.19) दुपारी 1 वाजेदरम्यान येथील स्टेट बँक इंडिया शाखेत गेले. त्यांच्या खात्यातून त्यांनी 49 हजार रुपये इतकी रक्कम यावेळी काढली. यावेळी त्यांना बँकेच्या परिसरातच एक 40 वयोगट असलेला अनोळखी व्यक्ती भेटला. यावेळी त्याने अनिल याला माझे नाव यादव असल्याचे सांगत कानपूरला राहत असल्याचे सांगितले.


मला गावाला पैसे पाठवायचे असून तू याकामी मला मदत कर मी मुंबई येथे किराणा दुकानात कामाला होतो. मात्र, मालकाने मला कामाचे पैसे दिले नाही. म्हणून मी त्याचे अडीच लाख चोरून आणले आहे. एका ट्रक मध्ये बसून येत असताना त्यांनी मला येथेच उतरून दिले. मला गावी जायचे आहे तू मला मदत कर असे सांगत त्याने रुमालात बांधलेले पैसे अनिल याला दाखविले. माझ्याकडे बँकेचे अकाउंट नाही असे सांगितले. मी तुला कुठल्याही प्रकारची मदत करू शकत नाही असे म्हटले. त्यावेळी तेथे एक 35 वर्षीय युवक येऊन अनिल याला बाजूला घेऊन गेला. यावेळी त्याने अनिल याला आपण सदर व्यक्तीचे दीड लाख रुपये पोस्टाने पाठवून देऊ व उर्वरित एक लाख अर्धे अर्धे वाटून घेऊ असे सांगितले. याला अनिल याने दुजोरा दिला. त्यानंतर अनिल यांनी दोघांना दुचाकीवर बसवीत औरंगाबाद रोडने करडी फाट्याकडे घेऊन गेला.
35 वर्षीय दुसऱ्या व्यक्तीने अनिल याला 40 वर्षीय व्यक्तीकडे असलेली अडीच लाखाची रक्कम तुमच्या ताब्यात घेण्यास सांगितले. त्यातून दीड वेगळे करा व एक लाख तुमच्याकडे ठेवा व त्या व्यक्तीला बस स्टँडवर सोडून या, असे अनिलला सांगतात. तुमच्या जवळ असलेली पैशाची थैली माझ्याकडे ठेवा. त्यावर अनिल यांनी विश्वास ठेवत त्या व्यक्तीजवळ असलेली रुमालातील रक्कम घेऊन स्वतः जवळ असलेली रक्कम त्या व्यक्तीकडे दिली आणि इथंच सर्व खेळ घडत फसवणूक झाली. त्यावेळी त्या भामट्याने अनिल विसपुते याला त्या रुमालातील अडीच लाख रक्कमेतून एक लाख वेगळे आणि दीड लाख वेगळे काढून घेण्यासाठी बाजूला जा. त्यानंतर अनिल काही अंतरावर दुचाकीने गेला व रुमालातील पैसे सोडून ते वेगळे करण्यासाठी रुमाल सोडला असता त्यामध्ये वह्याच्या पानाचा गठ्ठा आढळून आला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर सदर ठिकाणी दुचाकीने परत गेले असता तेथील दोन्ही भामटे आढळून आले नाही.

सीसीटीव्हीमध्ये कैद चेहरे
अनिल वीसपुते यांनी धाड पोलीस स्टेशनला या संदर्भात तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी भारतीय स्टेट बँक मधील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करून दोघांच्याही हालचालींवर संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी फसवणूक झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com