वर्धेत आहे भारताचा मध्यबिंदू, या संघटनेकडून होतेय सौंदर्यीकरणाची मागणी  

मंगेश वणीकर  
Monday, 17 August 2020

इंग्रजी राजवटीमध्ये हॅमिल्टन या इंग्रज अधिकाऱ्याने भारताचा नकाशा तयार करताना संपूर्ण भारताचा मध्यबिंदू हिंगणघाट शहर असल्याचे सिद्ध केले. शहरातील टाका ग्राउंडच्या बाजूला एक दगडी शिळा रोवली होती. ती आजही तिथे कायम आहे.

हिंगणघाट (जि. वर्धा)  :  हिंगणघाट शहर भारताचा मध्यबिंदू आहे. येथील टाका ग्राउंडजवळ दगडी शिळा रोवली आहे, पण याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. स्थानिक टाका ग्राउंडजवळील भारताचा मध्यबिंदू असलेल्या स्थळाचे सौंदर्यीकरण करा, अशी मागणी श्री जय भवानी माता सामाजिक संस्थेच्या वतीने मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे.
 
इंग्रजी राजवटीमध्ये हॅमिल्टन या इंग्रज अधिकाऱ्याने भारताचा नकाशा तयार करताना संपूर्ण भारताचा मध्यबिंदू हिंगणघाट शहर असल्याचे सिद्ध केले. शहरातील टाका ग्राउंडच्या बाजूला एक दगडी शिळा रोवली होती. ती आजही तिथे कायम आहे. कालांतराने अतिक्रमण, राजकीय, प्रशासकीय अनास्था, अस्वच्छता आदींमुळे या जगप्रसिद्ध स्थळाकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले. या इंग्रज अधिकाऱ्याचा मृत्युसुद्धा हिंगणघाट शहरातच झाला आहे. त्याची समाधी या जागतिक प्रेक्षणीय स्थळाच्या बाजूला आहे. नागपूर शहर भारताचा मध्यबिंदू म्हणून मानले जाते. प्रत्यक्षात नागपूर भारताचा मध्यबिंदू नाही. खऱ्या अर्थाने हिंगणघाट शहरच भारताचा मध्यबिंदू आहे. हा आपला गौरव परत मिळविणे आवश्‍यक आहे. 

क्लिक करा - 'आम्हाला कधीही सुखाने जगू दिले नाही, त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे'; वाचा छळामागच कारण
 

या स्थळाचे प्रेक्षणीय स्थळ म्हणून सौंदर्यीकरण करा, साफसफाई करा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. यावेळी नगरसेवक धनंजय बकाणे, सुरेश चौधरी, रवी काटवले, रमानभाई, प्रमोद गोहणे, आशीष भोयर, धनराज कुंभारे, तुषार हवाईकर, शंकर पाल, उमेश डेकाटे, दीपक जोशी, संदेश डेकाटे, अशोक पवनीकर, योगेश बाकरे, नीरज वाईकर, राहुल बंगाले, रूपेश तुमाने, राजू खांडरे, सनी बासनवार, कपिल गुमडेलवार, नीलेश वासाड, प्रकाश भानुसे, शुभम कुंभारे, मंगेश कामडी, निखिल कुंभारे, मयूर तुमाने, पंकज मसतकर, आशीष पाल, नीलेश साधनकर, राजू पोगडे, गणेश कुंभारे, राहुल किडिले, राहुल पराते आदी उपस्थित होते.   
 

सौंदर्यीकरणाचे आश्‍वासन

निवेदनाची दखल घेत मुख्याधिकारी यांनी तत्काळ या स्थळाला भेट दिली. साफसफाई, रंगरंगोटी, माहिती फलक लावणे, समाधी समोरील नझुलची जागा नगरपालिकेकडे वर्ग करून सौंदर्यीकरण करण्याचे त्यांनी आश्‍वासन दिले.

संपादन : अतुल मांगे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The center of India is neglected in wardha