राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी निःशुल्क; रूपरेषा ठरली

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी निःशुल्क; रूपरेषा ठरली

नंदोरी (जि. वर्धा) : राज्य सरकारने अकरावी प्रवेशासाठी प्रथमच राज्यामध्ये सामाईक प्रवेश परीक्षेचा (Common entrance exam) (सीईटी) निर्णय घेतला आहे. यासाठी शिक्षण आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती (Committee under the chairmanship of the Commissioner of Education) स्थापन करण्यात आली आहे. दहावीचा निकाल १५ जुलैच्या आसपास (Tenth result around 15th July) जाहीर केला जाणार आहे. त्यानंतर साधारणपणे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सीईटी घेण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. (CET-for-the-eleventh-admission-for-the-first-time-in-the-state)

अकरावी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सीईटीबाबत नुकताच शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे, दहावीची परीक्षा रद्द करण्यात आली. त्यानंतर अकरावीच्या प्रवेशासाठी सीईटीचा निर्णय घेण्यात आला आहे. सीईटीची विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी राज्य शासनाने त्याची रूपरेषा जाहीर केली आहे.

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी निःशुल्क; रूपरेषा ठरली
विमानामुळे आमदारकीला मुकलेले सुबोध मोहिते राष्ट्रवादीत

सीईटी आयोजित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात येत असून त्याचे अध्यक्ष आयुक्त असतील. त्यात सदस्य म्हणून राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष, एमसीईआरटी आणि बालभारतीचे संचालक, परीक्षा परीक्षेचे आयुक्त आणि माध्यमिक शिक्षण संचालकांचा समावेश आहे.

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी निःशुल्क

दहावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे. ही परीक्षा रद्द करण्यात आली; त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांना सीईटीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र सीबीएसई, आयसीएसई, सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे या केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाच्या सीईटीसाठी शुल्क भरावे लागणार आहे.

इयत्ता अकरावीला सर्वांना प्रवेश मिळणार

गतवर्षी राज्यात ३२ टक्के अकरावी प्रवेशाच्या जागा रिक्त होत्या. त्यामुळे अकरावीमध्ये सर्व दहावी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यास अडचण येणार नाही. सीईटी गुणांचे आधारे गुणवत्तेनुसार अकरावीला प्रवेश दिला जाणार आहे.

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांसाठी सीईटी निःशुल्क; रूपरेषा ठरली
आजपासून मॉन्सून सक्रिय; जोरदार पावसाचे संकेत

अशी असणार सीईटी

  • विद्यार्थ्यांसाठी पूर्तता ऐच्छिक

  • दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित प्रश्न

  • इंग्रजी, गणित, विज्ञान व सामाजिकशास्त्र या विषयावर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न

  • सीईटी १०० गुणांची अन् एकच प्रश्नपत्रिका राहील

  • सीईटीसाठी दोन तासांचा कालावधी

  • प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ आणि बहुपर्यायी असेल

  • दहावी निकालानंतर सीईटीसाठी पर्याय दिला जाणार

  • परीक्षा ऑफलाइन होणार

(CET-for-the-eleventh-admission-for-the-first-time-in-the-state)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com