esakal | आसावरी-निकिता दुहेरीत "चॅम्पियन'
sakal

बोलून बातमी शोधा

प्रशिक्षक चेतक खेडीकर व प्रसाद साधनकर यांच्यासोबत 15 वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटात विजेतेपद पटकाविणाऱ्या आसावरी व निकितासह अदिती साधनकर.

आसावरी-निकिता दुहेरीत "चॅम्पियन'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नागपूर : नागपूरच्या आसावरी खांडेकर व निकिता जोसेफने ठाणे येथे रविवारी संपलेल्या महापौर चषक राज्य सबज्युनिअर बॅडमिंटन स्पर्धेत 15 वर्षांखालील मुलींच्या दुहेरी गटात विजेतेपद पटकाविले. नागपूरच्याच अदिती साधनकर व अदिती तडसने 17 वर्षे वयोगटात उपविजेतेपद मिळविले.
दादोजी कोंडदेव इनडोअर सभागृहात खेळल्या गेलेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात आसावरी-निकिता जोडीने आलिशा नाईक व मधुमिता नारायण जोडीचा तीन गेम्समध्ये 13-21, 22-20, 21-13 ने पराभव केला. जवळपास पाऊण तास रंगलेल्या लढतीत आसावरी-निकिता जोडीने पहिला गेम गमावला. मात्र, त्यानंतरच्या दोन्ही गेम्समध्ये जोरदार खेळ करीत विजेतेपदाला गवसणी घातली.
17 वर्षांखालील मुलींच्या दुहेरीमध्ये अदिती-निकिता जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. निर्णायक लढतीत बिगर मानांकित अदिती-निकिता जोडीला अव्वल मानांकित ऋचा सावंत व रिया हब्बू जोडीकडून 18-21, 14-21 ने पराभव पत्करावा लागला. याच वयोगटातील मिश्र दुहेरीतही अदितीचे विजेतेपदाचे स्वप्न भंग पावले. अंतिम सामन्यात अदिती व ध्रुव ठाकोरे (पुणे) या द्वितीय मानांकित जोडीला अव्वल मानांकित आर्या ठाकोरे व ऱ्हिसा दुबेकडून 11-21, 13-21 ने हार पत्करावी लागली.

loading image
go to top