कोरोनामुक्तीसाठी चंदनवेली, येनगाववासींनी केली तंबाखूबंदी...इतर गावांनीही घ्यावा या गावांचा आदर्श

खुशाल ठाकरे
Saturday, 29 August 2020

थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी वर्षभरासाठी पानठेले व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी चंदनवेली, येनगाव येथे गाव संघटनेतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले. दोन्ही गावांतील नागरिकांनी ठरावावर स्वाक्षऱ्या करून गाव कोरोनामुक्त व तंबाखूमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील चंदनवेली व धानोरा तालुक्‍यातील येनगाव येथील गाव संघटनेतर्फे तंबाखूविक्री बंदीचा निर्णय नुकताच घेण्यात आला. दोन्ही गावांमध्ये पार पडलेल्या बैठकींमध्ये 'कोरोनामुक्तीसाठी तंबाखूविक्रीवर बंदी' असा गावाने ठराव घेतला आहे. गाव तंबाखूमुक्त करण्याचा निश्‍चय केला आहे. थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा गावात शिरकाव होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गाव ठेवण्यासाठी दोन्ही गावांतील नागरिकांनी तंबाखूमुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे.

 

कोरोना विषाणूने संपूर्ण जगाला आपल्या कवेत घेतले आहे. या विषाणूचे वाढते संक्रमण टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपाययोजना केल्या आहेत. थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी वर्षभरासाठी पानठेले व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे. या आदेशाची अंमलबजावणी होण्यासाठी चंदनवेली, येनगाव येथे गाव संघटनेतर्फे बैठकीचे आयोजन करण्यात आले.

 

थुंकीमुळे पसरतो कोरोना

यावेळी कोरोना विषाणूचा शिरकाव ग्रामीण भागातसुद्धा झाला असून यावर नियंत्रण ठेवण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी थुंकणे टाळले पाहिजे. थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्यामुळे गावामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आणणे आवश्‍यक आहे. यासंदर्भात दोन्ही गावांतील बैठकींमध्ये चर्चा करण्यात आली.

ठरावावर नागिरकांच्या स्वाक्षऱ्या

'साथरोग नियंत्रण कायदा १८९७' व 'सुगंधित तंबाखूविक्री बंदी कायदा' यानुसार संपूर्ण राज्यात तंबाखू व सुगंधित तंबाखू विक्रीवर बंदी असणे गरजेचे आहे. मात्र, कायद्यांचे उल्लंघन करीत तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री सुरूच आहे. थुंकीमार्फत कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची शक्‍यता असल्यामुळे तंबाखू विक्रीवर बंदी घालणे महत्त्वाचे आहे. ही बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच दोन्ही गावांतील नागरिकांनी ठरावावर स्वाक्षऱ्या करून गाव कोरोनामुक्त व तंबाखूमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

जाणून घ्या : सावधान! सर्वात मोठ्या धरणाचे 33 दरवाजे उघडले.. इतिहासातील सर्वात मोठा पाण्याचा विसर्ग; जिल्ह्यात पुराचा धोका वाढला

साखरेचा सडवा केला नष्ट

भामरागड तालुक्‍यातील कोसफुंडी गावापासून ४ किमी अंतरावर असलेल्या शेतशिवारात दारूविक्री होत असल्याची माहिती मिळताच गाव संघटनेने धाड टाकून जवळपास तीन मडक्‍यांत असलेला साखरेचा सडवा नष्ट केला. तसेच दारूविक्रेत्याला पुन्हा दारूविक्री न करण्याची तंबी व समज देण्यात आली. कोसफुंडी हे गाव दारूमुक्त आहे. मात्र गावापासून दूर वास्त्यव्यास असलेल्या एका व्यक्तीने छुप्या मार्गाने शेतशिवारात दारूभट्टी सुरू केली होती.

(संपादन : दुलिराम रहांगडाले)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Chandanveli, Yengaon residents ban tobacco