चांदपूरची गर्भवती माता बाइक रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chandpur pregnant mother admitted hospital by bike ambulance
चांदपूरची गर्भवती माता बाइक रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल

चांदपूरची गर्भवती माता बाइक रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल

अचलपूर : मेळघाटच्या अतिदुर्गम भागातील रुग्णांना वेळेवर औषधोपचार तसेच वैद्यकीय मदत मिळावी म्हणून आरोग्य विभाग वेगवेगळे प्रयोग करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मेळघाटातील तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांत स्ट्रेचर बाईक रुग्णवाहिका सुरू करण्यात आलल्या. त्यापैकी टेम्ब्रूसोंडा आरोग्य केंद्रातील बाईक रुग्णवाहिकेतून आज चांदपूरच्या पहिल्या गर्भवती मातेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. या मातेची सुखरूप प्रसूती करण्यात आली.

मिशन २८ अंतर्गत गर्भवती मातेला वेळेवर सेवा मिळाल्याचे आल्हाददायक चित्र गुरुवारी (ता. २४) पाहायला मिळाले. मेळघाटच्या अतिदुर्गम भागात रुग्णांना वेळेवर औषधोपचारासह वैद्यकीय मदत मिळावी यासाठी तीन बाइक ॲम्ब्युलन्स विथ स्ट्रेचर टेम्ब्रूसोंडा, बिजुधावडी, सलोना या तीन प्राथमिक आरोग्य केंद्रांना काही दिवसांपूर्वी हस्तांतरित केल्या होत्या. यामुळे दुर्गम भागातील गर्भवती महिला, लहान मुले तसेच गंभीर आजाराने ग्रस्त रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत त्वरित पोहोचवून त्यांना उपचार मिळणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या स्ट्रेचर रुग्णवाहिकेत रुग्णाला व्यवस्थितरीत्या झोपवून प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा तालुका रुग्णालयापर्यंत नेण्याची व्यवस्था आहे. सोबतच या ॲम्ब्युलन्समध्ये प्रथमोपचार पेटीसह ऑक्सिजन सिलिंडर, सायरन, वॉकी टॉकीसुद्धा उपलब्ध आहे.

चिखलदरा तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र टेम्ब्रूसोंडाअंतर्गत येत असलेल्या चांदपूर या गावातील ऊर्मिला किसन बेठेकर या गर्भवती मातेला प्रसूतिवेदना सुरू झाल्याचा फोन चिखलदरा येथे मिशन २८ सेंटरला अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांनी लावला होता. त्यानंतर याची माहिती टेम्ब्रूसोंडा आरोग्य केंद्राला देण्यात आली. त्यानुसार आरोग्य केंद्रतील रुग्णवाहिकेचे चालक देवीदास येवले चांदपुरात चारचाकी रुग्णवाहिका घेऊन जाण्यास अडचण येत असल्याने तत्काळ स्ट्रेचर बाईक रुग्णवाहिका घेऊन गावात पोहोचले. त्यानंतर बाईक रुग्णवाहिकेत गर्भवती मातेला आणून आरोग्य केंद्रात सुखरूप प्रसूती करण्यात आली. सध्या माता आणि बाळ सुखरूप आहेत.

मेळघाटच्या काही गावांत अरुंद रस्त्यांमुळे मोठी चारचाकी रुग्णवाहिका जाण्यास अडचण निर्माण होते. मात्र, आता बाइक स्ट्रेचर रुग्णवाहिका उपलब्ध असल्याने ती अडचण दूर झाली आहे. गर्भवती मातेला वेळेवर सेवा मिळाल्याने सुखरूप प्रसूती करण्यास मदत झाली.

-डॉ. चंदन पिंपळकर, वैद्यकीय अधिकारी, प्रा. आ. केंद्र, टेम्ब्रूसोंडा.

Web Title: Chandpur Pregnant Mother Admitted Hospital By Bike Ambulance

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..