esakal | चंद्रपूर : आदीलाबाद-गडचांदूर राष्ट्रीय महामार्ग चार तास बंद
sakal

बोलून बातमी शोधा

traffic

चंद्रपूर : आदीलाबाद-गडचांदूर राष्ट्रीय महामार्ग चार तास बंद

sakal_logo
By
दीपक खेकारे

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : सततच्या पावसाने व वादळी वाऱ्याने आदीलाबाद-गडचांदूर राष्ट्रीय महामार्गावर बाबूळ वृक्ष थेट ट्रक च्या समोरील भागावर कोसळल्याने वाहतूक चार तास बंद पडली होती. गडचांदूर वरून दोन किमी अंतरावर असलेल्या बालाजी सेलिब्रेशन जवळ दिनांक ११/०९/२०२१ रोजी सकाळी ६ च्या सुमारास ही घटना घडली असून सुदैवाने कुठलीही जीवितहानी घडली नाही.

सविस्तर वृत्त असे आहे की, गडचांदूर आदीलाबाद राष्ट्रीय महामार्गवर मोठं मोठे वृक्ष असून सतत पावसाच्या सरी कोसळत असून कल रात्री झालेल्या वादळी पावसाने राष्ट्रीय महामार्गावर वृक्ष कोसळल्याने महामार्ग चक्क चार तास बंद पडला होता.

हेही वाचा: डॉ. दिलीप मालखेडेंची अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

वृक्ष मोठं असल्याने संपूर्ण रस्त्यावर वृक्ष पसरलेलं होते.गडचांदूर पोलिसांना कळताच बचाव पथकाने अथक परिश्रमाने जेसीबी व कटर च्या साहायाने वृक्ष बाजूला करून सकाळी १० वाजता रस्ता खुला करण्यात आला गडचांदूर पोलिसांनी मोठी कामगिरी केली. महामार्ग ४ तास बंद असल्याने १० किमी अंतरावर गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या चार मोठे सिमेंट कारखाने असल्यानें वाहतुकीची कोंडी झाली होती. अनेकांना वेळेवर असलेल्या कामांचा खोळंबा झाला.

माहिती मिळतास स्वतः कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचलो व जेसीबी कटर मशीनच्या साहायाने वृक्ष बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

- सत्यजित आमले, पोलिस निरीक्षक, गडचांदूर पोलिस स्टेशन

loading image
go to top