esakal | चंद्रपूर: अवयव काढून वाघाला जाळले, भटाळीतील धक्कादायक प्रकार
sakal

बोलून बातमी शोधा

चंद्रपूर: अवयव काढून वाघाला जाळले, भटाळीतील धक्कादायक प्रकार

चंद्रपूर: अवयव काढून वाघाला जाळले, भटाळीतील धक्कादायक प्रकार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पोंभुर्णा: तालुक्यातील भटाळी येथील वाघाच्या शिकार प्रकरणातील आरोपींकडून दहा वाघनखे, मिशीचे सहा केस, दात आणि हाडे जप्त करण्यात आली आहेत. बुटीबोरी वनविभागाच्या पथकाने भटाळी येथे तीन जणांना वाघाच्या शिकार प्रकरणात ताब्यात घेतले आहे. वाघाच्या शिकारीनंतर त्याचे महत्त्वाचे अवयव काढून त्याला जाळून टाकण्यात आले. अटकेतील आरोपींनी आणखी काही शिकार केली असावी, या दिशेने वनविभागाचा तपास सुरु आहे.

हेही वाचा: शमीच्या वृक्षातून निघाले ‘शमी विघ्नेश’; चला पर्यटनाला

९ सप्टेंबरला पोंभूर्णा भटाळी येथील योगेश तोडासे याला वाघाच्या अवयवाची विक्री करताना बुटीबोरी येथे ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई बुटीबोरी प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी लहू ठोकड यांनी केली. अटकेतील योगेश याने वाघाची शिकार आणि त्यात सहभागी काही आरोपींची माहिती दिली. या माहितीच्या आधारे पोंभुर्णा वनपरिक्षेत्राधिकारी फणींद्र गादेवार, राजुरा वनपरिक्षेत्राचे फिरते पथकाचे वनकर आणि कर्मचारी यांनी आज १० सप्टेंबरला भटाळी गाठून दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १० वाघनखे, मिशीचे सहा केस, दात आणि हाडे जप्त करण्यात आली.

पथक सिंदेवाहीला रवाना

विजेचा धक्का देऊन वाघाची शिकार करण्यात आली. त्यासाठी वापरला गेलेला तारसुद्धा जप्त करण्यात आला. शिकारीनंतर वाघाचे महत्त्वाचे अवयव काढून त्याला जाळून टाकण्यात आले. या आरोपींच्या अटकेने वन्यप्राण्यांची शिकार करणारे मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता आहे. भटाळीच्या वाघाच्या शिकार प्रकरणाचे तार सिंदेवाही परिसरात जुळले आहे. त्याची चौकशी करण्यासाठी एक पथक सिंदेवाहीला रवाना झाले आहे.

loading image
go to top