चंद्रपूर: मालमत्ता दस्तऐवजाची नोंदणी करून देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याप्रकरणी दुय्यम निबंधक श्रेणी-१ आणि त्यांच्या डेटा ऑपरेटरविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली..लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपुरातील दुय्यम निबंधक कार्यालयात कार्यरत मोहन चंद्रकांत शेट्टीवार (दुय्यम निबंधक श्रेणी १) यांनी तक्रारदाराच्या पक्षकारांच्या मालमत्तेच्या दोन दस्तऐवजांची नोंदणी करून देण्यासाठी प्रत्येकी दोन हजार रुपये, अशा एकूण चार हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. दस्तऐवजांची नोंदणी झाल्यानंतर लाचेची मागणी करण्यात आल्याने तक्रारदाराने लाच देण्यास नकार दिला. .Nagpur: महिला बचत गटांना एक हेक्टर पडीक जमीन देणार, रोजगार निर्मितीसाठी महसूल विभागाचा निर्णय.मंगळवारी (ता. १६) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी पंचासमक्ष करण्यात आल्यानंतर एसीबीच्या पथकाने सापळा रचला. कारवाईदरम्यान आरोपींनी चार हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर संबंधितांविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.