PM Modi Mann Ki Baat
esakal
चंद्रपूर, ता. २४ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमासाठी विद्यार्थिनींना उपस्थित राहणे अनिवार्य केले आहे. या कार्यक्रमाला दांडी मारणाऱ्या विद्यार्थ्यांनीवर दंडाची कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. चंद्रपुरातील शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालयाशी संबंधित या प्रकारामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची सक्ती करण्यामागील कारण काय आणि या उपक्रमासाठी केवळ विद्यार्थिनींचीच निवड का करण्यात आली, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.