Chandrapur Crime: जिल्हा हादरला; डिजेचा वाद, जुन्या वैमनस्यातून ४८ तासात तिघांची हत्या

जिल्हा हादरला; चंद्रपुरात डिजेचा वाद, अंबोलीत जुने वैमनस्य
Chandrapur crime
Chandrapur crimeesakal

चंद्रपूर: मागील अठ्ठेचाळीस तासांतील तीन हत्यांनी चंद्रपूर जिल्हा हादरला. बल्लारपूर येथील युवकाच्या खुनाची घटना ताजी असतानाच चंद्रपूर आणि चिमूर येथेही खुनाच्या घटना घडल्या.

चंद्रपुरात दाताळा मार्गावर रामसेतू उड्डाण पुलावर डीजे लावण्याच्या वादातून एका चाळीस वर्षीय इसमाला शनिवार (ता. १७) ठार करण्यात आले. चिमूर तालुक्यातील आंबोली येथील जुन्या वादातून लाठीने वार करुन एका महिलेला शुक्रवारला जिवानिशी ठार केले.

बाबूपेठ येथील संदीप पिंपळकर यांचा लग्न सोहळा दाताळा मार्गावरील शोमॅन सेलिब्रेशन सभागृहात शनिवार (ता. १७) होता. वरातीत डिजेच्या तालावर नाचताना ओम पिंपळकर या युवकाशी वरातीतील काही अज्ञात मुलांचा वाद झाला.

Chandrapur crime
Jalgaon Crime: ऑनलाईन मैत्री पडली महागात! लग्नाचे आमिष देत मुलीवर अत्याचार

लग्न सोहळा आटोपल्यावर अज्ञात युवकांनी ओम पिंपळकर याला रामसेतू उड्डाणपुलावर अडवून मारहाण करणे सुरू केली. घटनेची माहिती ओमचे वडील किशोर पिंपळकर यांना होताच ते भांडण सोडवायला गेले.

अज्ञात मारेकऱ्यांनी त्यांचे डोक्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली. यात किशोर पिंपळकर खाली कोसळले. दरम्यान, मारेकऱ्यांनी पळ काढला. जखमी अवस्थेत किशोर पिंपळकर व ओम पिंपळकर यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

परंतु किशोर पिंपळकर यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला नेत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून हल्ला करणाऱ्या पाच आरोपींना अटक केली आहे.

या घटनेचा पुढील तपास रामनगर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक राजेश मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील गोपाले करीत आहेत.

दुसरी घटना चिमूर तालुक्यातील आंबोली गावात घडली. शारदा दयाराम वाघ (वय ४५) या महिलेला गोपीचंद संपत शिवरकर (वय ३२) याने लाठीने वार करुन ठार केले. ही घटना शुक्रवारी सायंकाळी सात वाजताच्या सुमाराला घडली.

गोपीचंद आणि शारदा यांचा काही महिन्यांपूर्वी वाद झाला होता. काल ती आपल्या घरासमोर बसली होती. तिचा मुलगा मोहन अंगणात खड्डा खोदत होता. त्यावेळी गोपीचंद तिथे लाठी घेऊन आला. त्याने शारदाच्या डोक्यावर लाठीने जोरदार प्रहार केला.

Chandrapur crime
Nagpur Crime: लग्नाचे आमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार

मोहन आईच्या मदतीला धाऊन गेला. त्याच्यावर गोपीचंदने हल्ला चढविला. त्याला जखमी केले. जखमी अवस्थेत मोहनने तिथून पळ काढला. डोक्यावर जबर मार लागल्याने शारदाचा काही वेळातच जीव गेला.

गोपीचंद हा गुंडप्रवृत्तीचा आहे. आंबोली येथील बेघर वस्तीमध्ये तो दहशत निर्माण करीत होता. यापूर्वी त्याने शारदा वाघ हिच्यासोबत वाद घातला होता. गोपीचंदच्या दहशतीमुळे शारदा आपल्या मुलास घेऊन शेजाऱ्याच्या घरी झोपायला जायची.

शारदा व तिचा मुलगा आरोपीच्या दहशतीखाली जीवन जगत होते. आरोपी गोपीचंद शिवरकर याला पोलिसांनी अटक केली. दरम्यान, गुरुवारला बल्लापुरात जुन्या वैमनस्यातून एका तरुणाची दगड आणि धारदार शस्त्राने हत्या केली. या प्रकरणात पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com