Chandrapur Farmer Sells Kidney Over Debt
esakal
चंद्रपूर : अवैध सावकारीच्या जाचामुळे एका शेतकऱ्याला किती टोकाचे पाऊल उचलावे लागू शकते, चंद्रपूर जिल्ह्यातील या धक्कादायक घटनेने अवघा महाराष्ट्र हादरला होता. नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुडे यांनी कर्जाच्या विळख्यातून सुटण्यासाठी परदेशात जाऊन आपले मूत्रपिंड विकले. आता न्यायासाठी तो प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहे. न्याय देवू शकत नसेल तर इच्छामरणाची परवानगी द्या, अशी मागणी त्याने जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.