Chandrapur crime News
esakal
चंद्रपूर - किडनी तस्करी प्रकरणातील दिल्ली येथील डॉक्टर रविंद्रपाल सिंगला शुक्रवारी चंद्रपूर न्यायालयात उपस्थित राहणार असल्याचे सांगितले जात होते. मात्र त्यांच्या प्रतीक्षेत असलेल्या पोलिसांना त्यांने चांगलाच गुंगारा दिला. एक दिवस आधीच, गुरुवारी तो चंद्रपुरात दाखल झाला आणि तात्पुरता जामीन मिळवण्यात यशस्वी झाला. त्यामुळे या रॅकेटमधील मुख्य दुवा हाती लागण्यास आता तपास यंत्रणेला मोठी कायदेशीर लढाई लढावी लागणार आहे.