Chandrapur Kidney Racket Case
esakal
चंद्रपूर ता. ९- नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील किडनी प्रकरणातील पिडीत रोशन कुळे यांची तब्बल २५ दिवसानंतर पालकमंत्री प्रा. अशोक उईके आणि जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी भेट घेतली. देशभरात हे प्रकरण गाजत असताना या दोघांनीही कुडे यांची भेट घेण्याचे सौजन्य दाखविले नाही. मात्र यात आता विरोधी पक्ष सक्रीय झाल्यानंतर कुडे यांच्यावरील अन्यायाची आठवण शासन आणि प्रशासनाला झाली.