Kidney Trafficking: हरियानातून ‘किडनी डोनर कम्युनिटी’ पेजचे संचालन
Chandrapur Kidney Sale Case New Shocking Revelations: किडनी विक्री रॅकेटमागे ‘किडनी डोनर कम्युनिटी’ नावाचे फेसबुक पेज असल्याचे उघड; हरियानातील व्यक्ती मुख्य सूत्रधार असल्याचा संशय.
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील पीडित शेतकरी रोशन कुडे याच्या किडनी विक्री प्रकरणाने देशभरात खळबळ उडविली असताना या प्रकरणात दररोज नवनवी धक्कादायक माहिती पुढे येत आहे.