Chandrapur Assistant Engineer Caught Taking Bribe
esakal
चंद्रपूर : प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत बसविण्यात आलेल्या सौरऊर्जा प्रणालीच्या मीटर जोडणीसाठी आवश्यक असलेले रिलीज ऑर्डर देण्याच्या बदल्यात लाच स्वीकारणाऱ्या महावितरणच्या सहायक अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ अटक केली. आमोद संतोष रंदये (वय ३८) असे अटक करण्यात आलेल्या सहायक अभियंत्याचे नाव असून, या कारवाईमुळे महावितरण विभागात एकच खळबळ उडाली आहे.