

Chandrapur Midday Meal Scheme
esakal
चंद्रपूर: राज्य शासनाच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन योजना राबविली जाते. त्यासाठी पुरवठाधारकांशी दरवर्षी करारनामा केला जातो. यंदा शाळेचे सत्र सुरू होऊनही पुरवठाधारकांशी करारनामा करण्यात आला नाही. त्याचा परिणाम अनेक शाळांतील तांदळासह कडधान्य संपले आहे. मध्यान्ह योजनेसाठी लागणारे अन्नधान्य संपल्याने विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे.