Chandrapur Municipal Corporation Results 2026
esakal
चंद्रपूर, ता. १६ ः महानगरपालिका निवडणुकीत राज्यभर भाजपची घौडदौड सुरू असताना, चंद्रपुरात मात्र काँग्रेसने भाजपचा विजयाचा अश्वमेध रोखण्यात यश मिळवले. भाजपमधील गटबाजी आणि काँग्रेसने नव्या उमेदवारांना संधी देण्याची घेतलेली जोखीम यशस्वी ठरली. परिणामी काँग्रेस बहुमताच्या काठावर पोहोचली व मित्रपक्षाच्या मदतीने सत्ता स्थापण्यात यशस्वी होईल.