Chandrapur Election: चंद्रपूरमध्ये 'असा' निघाला तोडगा! वडेट्टीवार–धानोरकर वादावर पडदा

Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar End 22-Day Feud Over Power Sharing: चंद्रपूरमधील काँग्रेसची अंतर्गत गटबाजी अखेर संपुष्टात आलेली आहे. दोन्ही गटांनी एकत्रित मिळून सत्तास्थापनेचा निर्णय घेतला.
27 Corporators Unite After High-Voltage Drama

27 Corporators Unite After High-Voltage Drama

esakal

Updated on

चंद्रपूरः आमदार विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात चंद्रपूर महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेवरून सुरू असलेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे. महानगरपालिकेच्या निकालानंतर तब्बल २२ दिवसांनी दोन्ही गट एकत्र आले असून, विभागीय आयुक्त कार्यालयात संयुक्तपणे गटनोंदणी करण्यात आली. या समन्वयामुळे दोन प्रमुख नेत्यांच्या संघर्षात वेठीस धरलेल्या काँग्रेसच्या २७ नगरसेवकांनी अखेर मोकळा श्वास घेतला. दरम्यान, या दोन्ही नेत्यांमध्ये सत्तेची वाटणी करण्यात आली असून, त्याचा लेखी करार झाल्याची माहिती आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com