Vidarbha Accident News I अजयपुर जवळ 2 ट्रकमध्ये जोराची धडक, 9 जणांचा होरपळून मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

accident

अजयपुर जवळ 2 ट्रकमध्ये जोराची धडक, 9 जणांचा होरपळून मृत्यू

चंद्रपूर - चंद्रपूर मूल मार्गावरील अजयपुर जवळ आज (शुक्रवारी) पहाटे दोन ट्रकमध्ये धडक झाल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात एकूण नऊजणांना मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे. या अपघातातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलिस घटनास्थळी पोहचले असून अधिकचा तपास सुरु आहे. दोन्ही वाहनांच्या चालकासह नऊजणांना होरपळून मृत्यू झाला आहे. त्यामुळे परिसरारत हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा: अखेर १६ दिवसांनी देशपांडे, धुरी पोहचले शिवतीर्थवर; राज ठाकरेंची घेतली भेट

दरम्यान, घडलेली घटना अशी की, आज पहाटे चंद्रपूरच्या मूल मार्गावरील अजयपुर जवळ पेट्रोल वाहतूक करणाऱ्या टँकर आणि लाकूड वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये जोराची धडक झाली आहे. अजयपुर जवळ हा भीषण अपघात झाला आहे. दोन्ही ट्रकची समोरासमोर धडक झाली असून अपघातानंतर दोन्ही वाहनांना आग लागली. या दुर्घटनेत दोन्ही वाहनांचे टायर फुटले असून या दोन्ही वाहनांतील चार जणांचा मूत्यू झाला आहे. घटनास्थळी मूल, चंद्रपूर येथील अग्निशमन पथक पोहचले असून त्यांनी ही आग विझवील आहे. या आगीत चारही मृतदेह जळाले असल्याने त्यांची ओळख अजूनही पटलेली नाही. अचानक झालेल्या या भीषण अपघातमुळे परिसरात हळहळ व्यक्त होतं आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे.

या अपघातात लाकडाच्या ट्रकमधील वाहन चालक अजय डोंगरे (वय 30 रा. बल्ल्लारपूर), प्रशांत नगराळे (वय 30) मंगेश टिपले (वय 25) महिपाल परचाके (वय 46) बाळकृष्ण तेलंग (वय 40), साईनाथ कोडापे (वय 40) राहणार नवी दहेली आणि संदीप कोडापे (वय 22 रा. तोहोगाव कोठारी) अशी मृतांची नावे असून ही सर्व मजूर लाकूड उतरविण्यासाठरी चंद्रपूरला येत होते. तर डिझेल टॅंकर चालकाचे नाव हनिफ खान (वय 35) असून तो अमरावती येथील आहे. येथील क्लिनर पस्तीस वर्षीय अजय पाटील असे दोन्ही होरपळून मृत पावले आहेत.

Web Title: Chandrapur Near Ajaypur Two Truck Accident And Four People Died In Crash

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top