dead body found
sakal
चंद्रपूर - शहरातील गजबजलेल्या प्रियदर्शिनी चौक परिसरात मानवी कवटी आढळली, तर काही अंतरावर रेल्वे पटरीलगत कुजलेल्या अवस्थेतील छिन्नविच्छिन्न मृतदेह सापडला. बुधवारी (ता. १८) सकाळी उघडकीस आलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, कवटी आणि मृतदेह एकाच व्यक्तीचे असावेत, असा पोलिसांना संशय आहे. मात्र, मृतदेहाची झालेली दुर्दशा आणि जनावरांनी खाल्लेल्या शरीराच्या भागांमुळे मृत व्यक्तीची ओळख पटविणे पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरले आहे.