esakal | काळी-पिवळी गाडीवर लिहिले "बुलाती है मगर जानेका नहीं"....दिला हा संदेश
sakal

बोलून बातमी शोधा

chandrapur taxi

दारूबंदी असलेल्या विदर्भातील तीन जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्हा एक आहे. या जिल्ह्यात लागू असलेली दारूबंदी हटविण्यासाठी अनेकांनी पत्रव्यवहार केला आहे. परंतु, जिल्ह्यातील गडचांदूर शहरात एका गाडी चालकाने आपल्या गाडीच्या मागच्या बाजूस "बुलाती है मगर जानेका नहीं" असे स्लोगन लिहिले आहे. याद्वारे त्याने, मद्यपान, धुम्रपान करू, नये असे आवाहन केले आहे.

काळी-पिवळी गाडीवर लिहिले "बुलाती है मगर जानेका नहीं"....दिला हा संदेश

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांनी सादर केलेली शायरी सोशल मीडियावर खूप हिट ठरली आहे. या शायरीवरून सर्वत्र विविध मिम्स तयार केले जात आहेत. टिकटॉक, व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर तर अगदी धुमाकूळ सुरू आहे. समाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी एका काळी-पिवळी चालकाने या शायरीचा वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने आपल्या गाडीच्या मागील भागावर "बुलाती है मगर जानेका नहीं" असे लिहिले आहे. या माध्यमातून त्याने मद्यपान व धुम्रपान करू नये, असा संदेश दिला आहे.

दारूबंदी असलेल्या विदर्भातील तीन जिल्ह्यांपैकी चंद्रपूर जिल्हा एक आहे. या जिल्ह्यात लागू असलेली दारूबंदी हटविण्यासाठी अनेकांनी पत्रव्यवहार केला आहे. परंतु, जिल्ह्यातील गडचांदूर शहरात एका गाडी चालकाने आपल्या गाडीच्या मागच्या बाजूस "बुलाती है मगर जानेका नहीं" असे स्लोगन लिहिले आहे. याद्वारे त्याने, मद्यपान, धुम्रपान करू, नये असे आवाहन केले आहे.

पती-पत्नी दोघेही मूकबधीर, कोणीही रोजगार देईना... वाचा त्यांच्या संघर्षाची कहाणी
 
या प्रयोगातून काळी-पिवळी चालकाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. जिल्ह्यात दारूबंदी असली तरी मद्यपान, धुम्रपान करण्याऱ्याची संख्या व त्यांच्या करीता उपलब्ध असलेल्या सोयीसुविधेची काही कमतरता नाही.

मद्यपान, धुम्रपान न करण्याचे आवाहन
"बुलाती है मगर जानेका नहीं" हा विषय सोशल मीडियावर गंमतीचा ठरलेला असताना एखाद्या गाडीचालकाने गांभीर्यपूर्व सामाजिक संदेश दिल्याने त्याते सर्वत्र कौतुक होत आहे.