

Chandrapur
esakal
चंद्रपूर: तेंदूपत्ता संकलनासाठी गेलेल्या चार महिलांचा बळी घेणाऱ्या वाघिणीला शनिवारी (ता. २३) सायंकाळी वनविभागाने जेरबंद केले. पवनपार तलाव परिसरात वनविभागाच्या पथकाने सापळा रचून वाघिणीला डार्ट मारून बेशुद्ध केले. वाघीण जेरबंद झाल्याने या भागातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. जेरबंद वाघीणीला चंद्रपूर येथील प्राणी बचाव केंद्रात पाठविण्यात आले.