esakal | Video : ठाकरे सरकारच्या मंत्र्यांमध्ये धुसफूस, तब्बल दहा राज्यमंत्र्यामनी केली कॅबिनेटमंत्र्यांची तक्रार
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackrey

कॅबिनेट मंत्री विश्वासात घेत नाही, आम्हाला सातत्याने डावलले जाते, आढावा बैठकांमध्ये काय होते हे सांगितलेच जात नाही, आमच्याशी संबंधित खात्यांचे निर्णय आम्हाला माध्यमांमधून कळतात, असे त्यांचे म्हणणे आहे. किमान आमच्याकडे असलेल्या खात्यांच्या निर्णयांबद्दलची माहिती तरी आम्हाला असावी अशी मागणी या मंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती आहे.

Video : ठाकरे सरकारच्या मंत्र्यांमध्ये धुसफूस, तब्बल दहा राज्यमंत्र्यामनी केली कॅबिनेटमंत्र्यांची तक्रार

sakal_logo
By
अरुण जोशी

अमरावती : महाविकास आघाडी सरकारमध्ये खातेवाटपावरून निर्माण झालेली नाराजी दूर झाल्याचे दिसत असले तरी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात सारे काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेताना कॅबिनेट मंत्री राज्यमंत्र्यांना विश्वासात घेत नसल्याचे पुढे आले आहे. सातत्याने डावलले जात असल्याची तक्रार दहापैकी सहा राज्यमंत्र्यांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या नाराज राज्यमंत्र्यांची व्यथा बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

वास्तविक, कॅबिनेट विरुद्ध राज्यमंत्री हा वाद तसा नवा नाही. राज्यमंत्र्यांच्या अधिकारांचा मुद्दा अनेक सरकारमध्ये याआधीही चर्चेचा विषय ठरला आहे. अब्दुल सत्तार, अदिती तटकरे, दत्ता भरणे, बच्चू कडू, शंभूराजे देसाई आणि सतेज पाटील या सहा राज्यमंत्र्यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आपापल्या कॅबिनेट मंत्र्यांविरुद्ध तक्रार केल्याचे कळते.

कॅबिनेट मंत्री विश्वासात घेत नाही, आम्हाला सातत्याने डावलले जाते, आढावा बैठकांमध्ये काय होते हे सांगितलेच जात नाही, आमच्याशी संबंधित खात्यांचे निर्णय आम्हाला माध्यमांमधून कळतात, असे त्यांचे म्हणणे आहे. किमान आमच्याकडे असलेल्या खात्यांच्या निर्णयांबद्दलची माहिती तरी आम्हाला असावी अशी मागणी या मंत्र्यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना केल्याची माहिती आहे.

वारिस पठाण यांना देवेंद्र फडणवीसांचे जोरदार प्रत्युत्तर, म्हणाले...

राज्यमंत्र्यांची कॅबिनेट मंत्र्यांवर नाराजी; बच्चू कडूंनी मांडली व्यथा 
या तक्रारीची दखल घेऊन, अजित पवार यांनी कॅबिनेट मंत्र्यांना समज दिली होती, असे सूत्रांनी सांगितले. मात्र, त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. उलट, राज्यमंत्र्यांचे दुःख वेगळ्या कारणासाठी असल्याची खोचक आणि सूचक चर्चा कॅबिनेट मंत्र्यांच्या वर्तुळात ऐकू येते.