Chandrapur Accident
sakal
विदर्भ
Chandrapur Accident: बाबा मला कार शिकवा! आग्रह मोडता आला नाही, अपघातात तीन लेकींना गमावलं; हृदयविकाराच्या धक्क्यानं वडिलांचं निधन
Chandrapur Accident: चंद्रपूर जिल्ह्यातील वणी परिसरात भीषण अपघातात वडील आणि तीन मुलींचा मृत्यू झाला. कार शिकत असताना झालेल्या अपघाताने संपूर्ण परिसर हादरला.
वणी : शहरानजीक असलेल्या लालगुडा गावाजवळ शुक्रवारी (ता.३१) सकाळी साडेदहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला तर एक लहान मुलगी गंभीर जखमी झाली आहे. मुलीला कार शिकविण्याच्या नादामुळे झालेल्या या अपघाताने संपूर्ण शहराला हादरवून सोडले आहे.

