14वर्षांनंतर झाला बदल; जिल्ह्यांचे सुधारित सरासरी पर्जन्यमान निश्‍चित 

चेतन देशमुख 
शनिवार, 4 जुलै 2020

दरवर्षी मॉन्सून कालावधीत शासनाकडून तयार करण्यात येणारे पर्जन्यमानाचे अहवाल तसेच विभागीय आयुक्तांकडे तयार करण्यात येणारे पर्जन्यमानाचे अहवाल हे सरासरी पर्जन्यमानाचे आधारे तयार केले जातात.

यवतमाळ : राज्यातील तालुक्‍यांचे सुधारीत सरासरी पर्जन्यमान निश्‍चित करण्यात आले आहे. तब्बल 14 वर्षानंतर यात बदल करण्यात आला आहे. यासाठी 1961 ते 2010 या कालावधीतील तालुकानिहाय दैनदिंन पर्जन्यमान विचारात घेवून जिल्हा तसेच तालुकानिहाय पर्जन्यमान नव्याने निश्‍चित करण्यात आले आहे. 

हे वाचा— विहिरीत आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात...

दरवर्षी मॉन्सून कालावधीत शासनाकडून तयार करण्यात येणारे पर्जन्यमानाचे अहवाल तसेच विभागीय आयुक्तांकडे तयार करण्यात येणारे पर्जन्यमानाचे अहवाल हे सरासरी पर्जन्यमानाचे आधारे तयार केले जातात. यासाठी जिल्हा तसेच तालुकानिहाय पर्जन्यमानाची सरासरी आकडेवारी विचारात घेतली जाते. अनेक तालुके तसेच जिल्ह्याच्या पर्जन्यमानात विविध कारणामुळे बदल होवू शकतो. त्यामुळेच साधारणत: पाच वर्षांच्या कालावधीनंतर मागील काही वर्षांतील नेमक्‍या पडणाऱ्या पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास करुन सरासरी पर्जन्यमान निश्‍चीत केल्या जाते. त्यानुसार यंदा तब्बल 49 वर्षातील पडलेल्या पावसाच्या आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला. उपलब्ध आकडेवारीवरुन भारत मौसम विभागाने नवे सुधारीत पर्जन्यमान निश्‍चीत केले आहेत. राज्यातील सर्वच जिल्हे तसेच तालुक्‍याचा यात समावेश आहे. 14 वर्षापुर्वी सरासरी पर्जन्यमान निश्‍चीत करण्यात आले होते. त्यानंतर सुधारीत पर्जन्यमान काढण्यात आले नव्हते. नव्या सुधारीत पर्जन्यमानानुसार सर्वच जिल्ह्याच्या पर्जन्यमानात बदल झाला आहे. यवतमाळ जिल्ह्याचे पुर्वीचे पर्जन्यमान 911.34 मिमी होते. यात आता वाढ झाली आहे. नव्या निश्‍चीतीनुसार आता जिल्ह्याचे पर्जन्यमान 926.80 आहे. याच पद्धतीने राज्यातील सर्व जिल्हे तसेच तालुक्‍याचे पर्जन्यमान निश्‍चीत करण्यात आले आहे. 

हे वाचा— कामठीत नागरिकांच्या घरांमध्ये शिरले कंबरभर पाणी; कोण आहे दोषी?
 

जिल्हे-पर्जन्यमान 

  • यवतमाळ-926.80 
  • अमरावती-972.30 
  • नागपूर-1060.30 
  • वाशिम-900.20 
  • अकोला-803.80 
  • वर्धा-1013.00 
  • बुलढाणा-760.40 
  • चंद्रपुर-1223.50 

पर्यावरणातील बदलानुसार विविध ठिकाणच्या पर्जन्यमानात बदल होत असतो. त्यांचा अभ्यासकरुन ते ठरविले जाते. त्यानुसार पुर्वी जिल्ह्याची वार्षीक सरासरी 911.34 होती. ती आता 926.80 झाली आहे. तालुक्‍यातील आकड्यातही बदल झालेला आहे. 
-ललीतकुमार वऱ्हाडे, निवासी उपजिल्हाधिकारी, यवतमाळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Change after 14 years; Determined revised average