
अमरावती : बेपत्ता असलेल्या अल्पवयीन जावेद अहमद खॉं (वय १४, रा. रेवसा) या मुलाचा मृतदेह गुरुवारी (ता. १७) सकाळी रेवसा नजीकच्या गजानन धाम परिसरात एका विजेच्या खांबाखाली जळालेल्या अवस्थेत आढळला, असे पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे यांनी सांगितले. दुर्गंधी आल्यामुळे ही घटना उघडकीस आल्याचे समोर आले.
जावेद अहमद खॉं (वय १४, रा. रेवसा) हा बेपत्ता असल्याची तक्रार बुधवारी देण्यात आली होती. त्यानुसार बेपत्ता झाल्याचा गुन्हाही नोंदविण्यात आला. आज मात्र, त्याचा मृतदेहच आढळून आला. विजेच्या धक्क्याने जळून त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता मनीष ठाकरे यांनी वर्तविली आहे.
घटनास्थळी कटर व आरी अशा वस्तू पडलेल्या होत्या. जावेद याच्या शरीराचा वरचा भाग आणि कपडे जळालेल्या स्थितीत आढळले. गाडगेनगर पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली.
बुधवारी (ता. १६) जावेदच्या आईने वलगाव ठाण्यात तक्रार दिली होती. त्यात जावेद याने मोबाईल घेऊन देण्याचा आग्रह केला होता. त्याला भीसीचे पैसे मिळाल्यानंतर मोबाईल देण्याचे आश्वासन दिले होते. तो खेळण्यासाठी घराबाहेर निघून गेला. परंतु, सायंकाळपर्यंत परत आला नाही.
त्यामुळे त्याच्या पालकांनी वलगाव ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता, असे वलगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सांगितले.
संपादन - नीलेश डाखोरे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.